मुरबाडमध्ये गुटखा विक्री रोखण्यास प्रशासन अपयशी? ‘टॉम-रोश्या’च्या चर्चांनी शहरात खळबळ
गौरव
शेलार / मुरबाड : राज्यात गुटखाबंदी असतानाही मुरबाड
शहरात गुटखा विक्रीचा धिंगाणा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक
भागांत सर्रास गुटखा विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून, या संपूर्ण प्रकरणात ‘टॉम आणि रोश्या’ची नावेही चर्चेत असल्याचे बोलले जात
आहे.मात्र हे नेमकी कोण आहेत हे गुलदस्त्यात आहे.
मात्र, संबंधित यंत्रणेला याची कल्पना आहे की नाही, हे
अद्याप गुलदस्त्यातच आहे. गुप्तचर यंत्रणा कोमात गेली आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात उघडपणे सुरू
असलेल्या या विक्रीमुळे गुटखाबंदी केवळ कागदावरच राहिली आहे का, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर गुटखाविरोधी मोहिमा राबवल्या जात असताना, मुरबाडमध्ये मात्र परिस्थिती वेगळी का दिसते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. "मुरबाडमध्ये गुटखा विक्री रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे का?" असा संतप्त सवालही नागरिकांच्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे.
‘टॉम-रोश्या’च्या चर्चांमागील सत्य काय, गुटखा
विक्रीचे जाळे नेमके कोण चालवत आहे आणि संबंधित यंत्रणा यावर कठोर कारवाई कधी
करणार, याकडे आता मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.



No comments