"जल जीवन मिशन भ्रष्टाचाराचा ‘आका’ मयूर नामक मोकाट? कोट्यवधींच्या निधीवर प्रश्नचिन्ह; अधिवेशनात प्रकरण गाजणार?
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आसोळे-असोसे परिसरातील जल जीवन मिशनच्या
कामांशी संबंधित असलेल्या कथित ‘आका’ मयूर नामक याच्याविरोधात आता जनआक्रोश उफाळून
येऊ लागला आहे. फणसोली, सुकाळवाडी आणि कोळे
गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता,
निकृष्ट दर्जाची कामे आणि निधीच्या गैरवापराचे आरोप स्थानिक
नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
ग्रामस्थांच्या
म्हणण्यानुसार, केंद्र व राज्य
सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र अनेक ठिकाणी कामांची गुणवत्ता संशयास्पद
असून काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे शासनाचा
निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष
म्हणजे, विविध गावांमधून
सातत्याने तक्रारी होत असतानाही संबंधितांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली
नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे. "तक्रारींचा पाऊस
पडत असताना संबंधितांवर कारवाई का होत नाही?" असा
प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, संबंधित कामे करणाऱ्या संस्थेची आणि सोसायटीची
सखोल चौकशी करून तिला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सध्या
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा विषय विधानसभेत
आणि विधान परिषदेत गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष तसेच
स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रकरणाकडे लक्ष वेधणार का,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचा सवाल!
"जल जीवन मिशनसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे गेला? कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी असूनही संबंधितांवर कारवाई का
होत नाही?"
या
प्रकरणी शासन, जिल्हा प्रशासन आणि
संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.



No comments