ज्योती नामादेव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नवीन दैनिक "जनदिशा" वृत्तपत्राचे आमदार किसनराव कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशन उद्घाटन...!
मुंबई : मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून संपूर्ण देशात पत्रकारिता बरोबर देशपातळीवर पत्रकारांची एनजीओचे नेतृत्व करणाऱ्या शेलार कुटुंबीयांच्या नवीन दैनिक "मुरबाड जनदिशा" या वृत्तपत्राचे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून 19 सप्टेंबरला होत आहे.ज्योती नामादेव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या "स्वप्नज्योती टाइम्स" शासन जाहिरात यादीवर असून "युवा महाराष्ट्र लाईव्ह"(YML NEWS) टीव्ही न्यूज IPTV MIB BROADCAST मान्यता चॅनेल संपूर्ण देशात परदेशात लाखो वाचकांचे लोकप्रिय टीव्ही चॅनल बनले आहे. शासकीय नियमाचे पालन करून सडेतोड निर्भीड लिखाणाचे झुंजार मीडिया महाराष्ट्राच्या मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून अखंडपणे नियमित सुरू आहे.
त्यामध्ये एका नवीन दैनिक "मुरबाड जनदिशा"ची भर पडली आहे. या नवीन दैनिकाचे उद्घाटन प्रकाशन राज्याचे लोकप्रिय नेते विकासाचा केंद्रबिंदू आमदार किसनराव कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते होत आहे. निपक्ष निर्भीड प्रत्येक घटकाच्या समस्यांना शासन दरबारी न्याय देण्यासाठी नवीन पिढीला "जनदिशा" प्रेरणादायक ठरणार आहे. विविध सदरे ,वाचकांची पत्रे, साहित्यिक लेख रोजच्या घडामोडी प्रकाशित होणार आहेत.विविध राज्य जिल्हे यामधून विभागीय पुरवण्या प्रकाशित केल्या जाणार असून संपूर्ण महाराष्ट्र देशात "जनदिशा" वृत्तपत्र न्यायिक भूमिका बजावणार आहे.मुंबई,ठाणे सह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख कार्यालय मुरबाड सारख्या ग्रामीण भागात ठेवण्यात आले असून ठाणे, मुंबई ,पालघर, रायगड ,पुणे अशा सर्वत्र विभागीय कार्यालयाचे उद्घाटने मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत.



No comments