web-banner-lshep2024

Breaking News

ठाणे सार्वजनिक बांधकामचा प्रताप पेपरात जाहिराती दिल्याचे खोटे भासवून कामाच्या टेंडर मध्ये घपला..!

 

नामदेव शेलार / ठाणे: महाराष्ट शासन दरवर्षाला दळणवणन सुधारणा व्हावी म्हणून रस्त्याच्या नावाखाली कोट्यावधीचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याला उपलब्ध करून दिलं जाते मात्र दिलेल्या निधीत किती कामे पुर्णत्वास येतात किंवा झालेली कामे जनतेच्या हिताचा साठी कितपत योग्य आहेत यांची कोणत्याच विभागाकडून चौकशी केली जात नाही.ठाणे सार्वजनिक बाधकाम विभागात पेपर मध्ये जाहिरात दिल्याचे खोटं भाषवून कोटी रुपये निधी अधिकारी, ठेकेदार यांनी लंपास केला आहे, त्यातच या कामाची दर्जेदार पणा तपासणारी यंत्रणा गुणदक्षता विभागात गुण आणी दक्षता यांचा अभाव असल्याने शासनाचा निधी आपल्या पदरात कसा पाडता येईल ह्या विचारात असलेले ठाणे सांबा विभागात उच्चशिक्षीत अधिकारी असले तरी ठेकेदारांना पोसण्याच्या जबाबदारीने कामांत" उंची " गाठता येत नाही

कामे करण्साच्या टेंडर प्रक्रियेत डोळे मिटून दूध पिणा-या मांजरीला लाजविल अशी कृती या विभागाने केली असून येथील एका दक्षनागरिकांनी माहितीच्या अधिकारी खाली 16 कोटी 55 लाख 19हजार एवढ्या रकमेचा भांडा फोड केला आहे, या विभागाचा हा केवळ एक नमूना असून अशाच प्रकारे नियोजनबद्ध रित्या कामाचे टेंडर प्रक्रीया केवळकागदावर राबवून आपली व लगतच्या भागिदार ठेकेदारांची पोळी. भाजून घेतली जाते, ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागाचा विकास साधणा-या विभागात रस्त्याच्या नावाखाली शहापूर व मुरबाड-शहापुर या दोन तालुक्यातील विविध कामासाठी सुमारे १६ कोटी ५५ लाख १९ हजाराची कामे ठाणे कार्यकारी अभीयंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ ठाणे यांनी ई-निवीदा सुचना क्रमांक २७ दि. २३/०८/२०२४ रोजीची वर्तमान पत्रात प्रसिद्ध न करता मर्जीतल्या भागिदारीत कामे करणा-या ठेकेदारांनाच सदर कांमाचे वाटप करून कुपणानेच शेत खाल्यासारखे शासकियकर्मचारीनी शासनाचे आर्थिक नुकसान केलेले आहे,यातील बहुतांश कामांसाठीचा निधी हा आदिवासी विकास विभागाने मंजूर केला असला तरी आदिवासी भागांचा विकास करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदांराचा विकास करण्यात आपलं उच्चशिक्षण येथे कामाला लावलं आहे.

  कामाची ई-निवीदा मॅनेज करण्याचा उतम मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ठाणे यांनी शोधला आहे, येथील एका दक्ष नागरिकांनी या बाबत माहिती अधिकीरा खाली घेतलेल्या माहिता नुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांनी निविदा सुचना दि. ३०/०८/२०२४ रोजी दै हर समय आप के साथ इंग्रजी दै इंडियन एक्स्प्रेस व अशा अनेक वृत्तपत्रांना वरील रकमेचे काढलेले टेंडर पारदर्शी पणे व्हावे म्हणून प्रकाशनासाठी पाठविण्यात आलेले आहे असे दि.२९/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये कार्यकारी अभियंता यांना कळविले होते, परंतू दि. ३०/०९/२०२४ च्या इंडियन एक्स्प्रेस व अन्य वृत्तपत्रांच्यात सदरची ई निविदा सुचना प्रसिद्ध झालेली नव्हतीच तसेच ज्या दैनिकांची नावे दिली त्यात निविदा जाहिरात लावली गेली नसतांना देखील निविदा स्वीकारण्यात आल्या तसेच ज्या दैनिकात जाहिरात दिली गेली त्या दैनिकाला जाहिरात मुल्य दिल्याच्या रकमा अदा केल्याच्या नोंदी देखील संबधीत सांबाच्या दप्तर नोंद नसल्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या पत्राची चौकशी होणे आवश्यक आहे तसेच दैनिकात टेंडर नोटिश प्रकाशित न करता केवळ बोगस टेंडर नोटिसीचा फार्स करणा-या येथील साबा विभागाची सखोल चौकशीची मागणी जनसंपर्क कार्यालया कडे करण्याात आली असल्याने त्यांची योग्य चौकशी झाली तर ठाणे साबा च्या झारीतील शुक्राचार्यां ची पोलखोल होऊन शासकिय कर्मचारी कि शासकिय लुटारू चा खरा चेहरा समोर येईल

No comments