web-banner-lshep2024

Breaking News

भारत वॉइन शॉपला वाचवण्यासाठी नगरपंचायत अधिकारी सह अन्य यंत्रणा सज्ज ; उपोषणामुळे हप्त्यात वाढ होणार का? नागरिकात चर्चा;मात्र तक्रारदार उपोषणावर ठाम..!

 

गौरव शेलार / मुरबाड,ठाणे : गेली कित्येक महिण्यापासून भारत वॉइन शॉपला हद्दपार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते,स्थानिक नागरिक यांनी विरोध केला असून तक्रारीसुद्धा केल्या आहेत त्यावर कारवाई करण्यास प्रशासन असमर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. तक्रारदाराची तक्रार राजकीय पुढारीच्या एक फोन वर डब्यात टाकून दिली जात असून अधिकारी आपला हप्ता अधिक वाढून तक्रारीला केल्याची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

भारत वाईन शॉपला हद्दपार करण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीच्या 17 प्रभागाच्या नगरसेविका व नगरसेवक यांनी सर्वानुमते एक मताने ठराव घेतल्याचे माहिती समोर येत आहे.त्यावर कार्यवाही तसेच कारवाई शून्य असून आज रोजी पर्यंत भारत वॉइन शॉपवर कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नसल्याने सदर प्रकरण गुलदस्त्यातच राहिला आहे.

मराठा आंदोलन पाठोपाठ आता भारत वॉइन शॉपवर कारवाई साठी थेट मंत्रालयासमोर उपोषणाचा निर्णय तक्रारदाराने घेतला असून येत्या 5 सप्टेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथील दालनातच उपोषण होणार असल्याचे तक्रारदार यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे.त्यामुळे आता मुरबाड मधील भारत वॉइन शॉपवर कारवाई होईल का? की पुन्हा हप्ते बाजीने भारत वॉइन शॉपला राजकीय रंगाचे वळण येणार हे मात्र पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

No comments