मुरबाड मधील 65 ते 70 नागरिक काठमांडू नेपाल येथे अडकून;आमदार किसन कथोरे यांनी संवाद साधून दिला धीर
गौरव शेलार / मुरबाड : कल्याण मुरबाड धसईसह अन्य परिसरातील 65 ते 70 नागरिक नेपाल काठमांडू येथे फिरण्यासाठी गेले असून नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे तेथील वातावरण गडुळ झाल्याने पर्यटकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याचे समजत आहे.नेपाळमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्यात आली आहे.मुरबाड कल्याण येथील अडकलेल्या नागरिकांनी थेट स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याकडे परतीसाठी साध घातली आहे.
व्हीडीओ कॉलींगव्दौरे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी अडकलेल्या नागरिकांना धीर देवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच आपल्याला सुखरूप महाराष्ट्रात आणण्यात येईल अशा धीर देण्याात आला आहे.सदरील घटनास्थळावरून संतोष शेलवले यांनी थेट युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीशी संपर्क करून आम्हाला आमदार किसन कथोरे यांनी धीर दिला असुन आम्हाला लवकरच परतीसाठी राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. व सदरील आमच्यासोबत 65 ते 70 लोकं असून ते सर्व याठिकाणी एका हॉटेल मध्ये सुखरूपपणे असल्याचे सांगितले.



No comments