web-banner-lshep2024

Breaking News

विठ्ठलाची पंढरी टोपित साकारली मुरबाडचे चित्रकार सचिन पोतदार यांचा उपक्रम..!

नामदेव शेलार / मुरबाड : भाकरी खात असताना विचार आले असता ताटातील भाकरीवर थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र डोळ्यासमोर ठेवून शिवरायांना मानवंदना देऊन त्यांचे चित्र भाकरीवर रेखाटले होते त्याच धर्तीवर आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुरबाडची चित्रकार सचिन पोतदार यांनी थेट टोपीवर पंढरीच्या विठोबाचे चित्र साकारले.शेकडो किलोमीटर अंतराहून वारकरी पंढरीला पायी जात आहेत टाळ मृदुंग वाजवत गाजत ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता लहानांपासून वयोवृत्तांपर्यंत लाखो भाविक भक्त पंढरीच्या वारीत सामील झाले.

   पंढरीच्या विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले त्याच पंढरीच्या एकादशी दिवशी मुरबाडचे सुप्रसिद्ध चित्रकार सचिन पोतदार यांना पांडुरंगाचा भास झाल्याने त्यांनी थेट डोक्यावरील नव्या कोऱ्या टोपीवर विठ्ठलाची मूर्ती वारकऱ्यांची दिंडी पंढरीचे मंदिर अशी प्रतिकृती साकारली दिवस-रात्र भक्तीचा सजलेला मेळा त्यांची पंढरी एकाच टोपीत कोरून आपल्या कलागुणांना वाव दिला त्यांचे मुरबाड करांनी स्वागत केले आहे.

पुढच्या वर्षी संपूर्ण पंढरीची वारी पांडुरंग टोपीवर साकारून हजारो वारकऱ्यांना पंढरीची टोपी भक्तांना मोफत वाटप करण्याचा संकल्प आमदार किसनराव कथोरे विकास मंचच्या अध्यक्ष ज्योतीताई शेलार यांनी संकल्प केला आहे. मुरबाडच्या शाळा कॉलेज विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते हजारो मुरबाडकर पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनी गेले आहेत शिरवली मानिवली येथील हभप रामभाऊ दळवी यांनी पायी दिंडी मोहोप सरळगाव मंदिरामध्ये भक्ती भावाने काढली होती संपूर्ण मुरबाड तालुका आषाढी एकादशीच्या आनंदात नाहून गेला होता त्यामध्ये चित्रकार सचिन पोतदार यांनी डोक्यातील टोपीवर संपूर्ण पायी दिंडी पांडुरंगाची चित्र रेखाटून भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत

No comments