web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये प्लास्टिक पिशव्या पुरवणाऱ्या होलसेल धारकांना पकडण्यासाठी नगरपंचायतीच्या आरोग्य अधिकाऱ्यांना अपयश;प्लास्टिक पिशव्या अडून वसुली..!

नामदेव शेलार / मुरबाड : शासनाने प्लास्टिक वर बंदी आणल्यापासून मुरबाड नगरपंचायत हद्दीत बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या चिकन मटन किराणदारांसह सर्वच दुकानात पुरवणारे होलसेल विक्रेते अद्याप नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना सापडले नसल्याने आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे. मुरबाड शहरात तालुक्याची बाजारपेठ आहे मुरबाड शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्व वस्तूंची छोटी-मोठी दुकाने रस्त्यावर आहेत चिकन मटणाच्या दुकानांना बाजारपेठा नसल्याने रस्त्या रस्त्यावर मटन मच्छी चिकनची दुकाने थाटली आहेत.

   त्याची दुर्गंधी आरोग्याला धोकादायक बनली आहे त्याच दुकानात प्लास्टिक पिशव्या विक्री होतात त्यांच्यावर कारवाई होत नाही प्लास्टिक पिशव्यांच्या कंपन्या बंद केल्या पाहिजेत होलसेल दारावर कारवाई करून ग्राहक आणि दुकानदारांना पर्यायी व्यवस्था केली पाहिजे त्याकडे मुरबाड नगरपंचायतीचे दुर्लक्ष करून गरीब छोट्या दुकान धारकांकडून पावत्या फाडून मोठी हॉटेल किराणा दुकाने दूध वाले मटन चिकन मच्छी वाले यांच्यावर कारवाई केली जात नाही पाच हजार रुपये पावती फाडण्याची धमकी देऊन 500 रुपयाची वसुली करणारी मुरबाड नगरपंचायतीची गॅंग मुरबाड मधील प्लास्टिक पिशव्यांचा होलसेल विक्री करणाऱ्यांना पकडण्यास अपयशी ठरली आहे.

प्रत्येक वस्तूला प्लॅस्टिक येत असतो त्याच प्लॅस्टिकची घाण रस्त्यावर होते घराच्या छतावर प्लास्टिक लावला जातो केवळ प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करून दुकानदारांना वेटीस धरण्यापेक्षा आरोग्य विभागाने जागोजागी ओला कचरा सुका कचरा डबे ठेवावे जंगलाच्या रस्त्यावर शहरांमधील कचरा टाकला जातो तोच कचरा पावसाळ्यातील पाण्याने नदी नाले पाण्यात वाहून जातो त्यासाठी कचऱ्याचा स्वतंत्र डंपिंग ग्राउंड उभारून त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे स्वच्छता विभागाच्या नावाने चार भिंती कार्यालयाच्या रंगवून चार गरीब दुकानदारांवर पिशव्यांच्या नावे कारवाई करणाऱ्या मुरबाड नगरपंचायतीच्या स्वच्छता अभियानाचा निधी अन्य कामासाठी वापरला त्याची चौकशी करण्यासाठी शहरवासीयांनी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवले आहेत.

  मुरबाड शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत गटारी दुर्गंधीमुळे झाल्या आहेत नगरपंचायत कार्यालयाच्या सहभोवती परिसरात शौचालय नसल्याने नागरिक रस्त्यावर लघु शंका करत आहेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ऑनलाइन शौचालय पाणी नसल्याने शौचालय बंद आहे त्यामध्ये नागरिकांनी दगडी घेऊन जावे काय असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

No comments