कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या प्रभारीपदी महेंद्र धनगर यांची नियुक्ती..!
मुरबाड : भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या अतिक्रमण व जागेच्या मालकी हक्काच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती’ ही कार्यसमिती संपूर्ण राज्यभर कार्यरत आहे. या समितीच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी दिलीप तातू धनगर तर तालुका प्रभारीपदी महेंद्र धनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या अध्यक्षतेखाली व उपस्थितीत ही नियुक्ती मुरबाड येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथील समारंभात करण्यात आली.महेंद्र धनगर,दिलीप धनगर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाड तालुक्यात सामाजिक, धार्मिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यात सक्रिय आहेत. आंबेडकरी चळवळीत सामाजिक कार्यात व आरोग्य सेवेत सक्रिय कार्यकर्ते असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
No comments