अश्विनी भिडे आता सांभाळणार मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार;मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
गौरव एनएस / मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची बदली झाली आहे. अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हे ब्रिजेश सिंह हे पाहत होते. त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आएएस
अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील 25 वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोचे जाळे
निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना
मुंबई मेट्रो वुमन म्हणून देखील ओळखले जाते. आता त्यांची बदली करण्यात आली
असून, त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभरा सांभाळणार आहेत.
No comments