web-banner-lshep2024

Breaking News

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांची पत्रकार परिषद संपन्न

 

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने काल, दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केली. त्यानुसार कालपासून संपूर्ण जिल्ह्यात व राज्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला व विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी निवडणूक कार्यक्रम, समन्वय अधिकारी, आचारसंहिता, निवडणूक खर्च नियंत्रण, जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी, मतदान केंद्रांची माहिती, विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम-व्हीव्हीपॅट तपशिल, टपाली मतपत्रिका, निवडणूक सुविधांविषयीचे ॲप्स अशा विविध निवडणूक विषयक बाबींची माहिती दिली.

अर्ज भरणे सुरुवात:- दि.22 ऑक्टोबर 2024, अर्ज भरण्याची शेवटीची मुदत:- दि.29 ऑक्टोबर 2024, अर्ज छाननी:- दि.30 ऑक्टोबर 2024, अर्ज मागे घेण्याची मुदत:- दि.4 नोव्हेंबर 2024, मतदान दिनांक:- दि.20 नोव्हेंबर 2024, मतमोजणी दिनांक:- दि.23 नोव्हेंबर 2024.ठाणे जिल्ह्यात 134-भिवंडी ग्रामीण (अ.ज.), 135-शहापूर (अ.ज.), 136-भिवंडी पश्चिम, 137-भिवंडी पूर्व, 138-कल्याण पश्चिम, 139-मुरबाड, 140-अंबरनाथ (अ.जा.), 141-उल्हासनगर, 142-कल्याण पूर्व, 143-डोंबिवली, 144-कल्याण ग्रामीण, 145-मिरा भाईंदर, 146-ओवळा माजिवाडा, 147-कोपरी पाचपाखाडी, 148-ठाणे, 149-मुंब्रा कळवा, 150-ऐरोली, 151-बेलापूर असे 18 विधानसभा मतदारसंघ  आहेत. यामध्ये एकूण 6 हजार 894 मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध असून प्रत्यक्ष कामकाजासाठी 35 हजार मनुष्यबळ आवश्यक आहे.

ठाणे जिल्ह्यात दि.15 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 71 लाख 55 हजार 728 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार: 38 लाख 13 हजार 264, महिला मतदार: 33 लाख 41 हजार 70, इतर/तृतीयपंथी मतदार: 1 हजार 394 आहेत. तसेच सैनिक मतदार: 1 हजार 599, एनआरआय मतदार: 977, दिव्यांग 37 हजार 854, 18-19 वयोगटातील 1 लाख 65 हजार 597 मतदार तर 85 पेक्षा अधिक वयोगटातील 57 हजार 209 मतदार आहेत.तरी, आचारसंहिता काळात सर्वांनी मा.भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

No comments