मुरबाड शहरात रोशनचा तारा गुटखा तेजीत...!
गौरव शेलार / मुरबाड : तरुण पिढीच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्यात 2012 पासून बंदी घालण्यात आली आहे.मात्र आजही शाळा कॉलेजच्या परिसरातील अनेक पानटपयांवर गुटखा व पान मसाला सहज मिळताना दिसतो मुरबाड शहरात स्कुटी गाडीवर रोशन नामक सह अन्य मोठया प्रमाणात गुटखा विक्री करत आहेत या गुटखा विक्रीला कोण पाठबळ दतोय हे मात्र गुलदस्त्यात आहे.
रोशन सह अन्य दोन ते तीन जण संपुर्ण शहरात गल्लो गल्ली एमआयडीसी नॅशनल हायवे लगतच्या सर्व टपर्यांवर हा गुटखा विक्री खुल्लेआम केला जातो.तसेच नवीन तारा गुटखा मार्केट मध्ये आला आहे त्या ताराच्या किंगला कोण पाठबळ देतोय हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. हप्तेबाजीने हा गोरख धंदा जोमाने सुरु आहे याकडे अन्न व औषधे विभागाने सुध्दा हप्तेबाजीने दुर्लक्ष केले असल्याची चर्चा नाक्या नाक्यावर आहे.
No comments