बदलापूर प्रकरणात मुख्याध्यापक निलंबित, पोलीस निरीक्षकाची बदली
मुंबई : बदलापूर येथील प्रतिथयश शाळेत दोन चिमुरड्यांवर
झालेल्या अतिप्रसंगाचे पडसाद आज बदलापुरात उमटले या शाळेतील
विद्यार्थ्यांचे पालक आणि जनता आज रेल्वे ट्रॅकवर मोठ्या संख्येनं उतरले
यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली दरम्यान राज्य सरकारने या
प्रकरणाची गंभीर दाखल घेत शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित
करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी
करण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करण्यात आली असून .
संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत
.संतप्त
जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले आहे. तुरळक दगडफेकही झाली
आहे.लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती
नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर
संतप्त जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली यात अनेक पोलीस जखमी झाल्याचे
वृत्त आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल,
असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश दिले
आहेत सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते
तपासण्याचे निर्देशदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत .झालेल्या
मन:स्तापाबद्दल संस्थेने माफी मागितली आहे.
कायदा
व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन
करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.
No comments