मुरबाडच्या अंगणवाडी सेविकेचा अधिकाऱ्याच्या छळाने मृत्यू
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शेळकेपाडा येथे राहणारी अंगणवाडी सेविका जयश्री हरिश्चंद्र कडाळी यांचा अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून मृत्यू झाला आहे जयश्री हरिश्चंद्र कडाळी यांना काही कारणास्तव निलंबित केले होते त्यांना कामावर घेण्यासाठी अंबरनाथ येथील बाल विकास प्रकल्प विभाग अधिकाऱ्यांनी कामावर घेण्यास टाळाटाळ केली.
अपमानित शब्द वापरले त्यांना कामावर ऑर्डर घेऊन येण्यासाठी अधिकाऱ्याने मंत्रालयात पाठवली होती तेथेही तिला न्याय मिळाला नाही तेथून परत येताना रस्त्यात तिचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.
सदर अधिकाऱ्यांवर मृत्यूस कारण म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे सदर घटनेची माहिती आमदार किसन कथोरे यांना मिळताच त्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून कडाळी कुटुंबीयांचे सांत्वन करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
मयत जयश्री कडाळी यांचा मृत्यू देह डोंबिवली शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे त्यांचा मुलगा अविनाश कडाळी आईच्या प्रेताजवळ आक्रोश करत आहे.
No comments