web-banner-lshep2024

Breaking News

बदलापूर घटनेचा मुरबाडमध्ये निषेध;चिमुकलीच्या हस्ते निवेदन...!


मुरबाड: बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध मुरबाडमध्ये जोरदारपणे करण्यात आला. आज, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रमोद सावंत यांनी शालेय विद्यार्थिनी आणि महिलांना एकत्र करून मुरबाड पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात निवेदन देण्याचा उपक्रम राबवला.
 

      कुमारी आरोही सावंत या चिमुकलीच्या हस्ते निवेदन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर आणि नायब तहसीलदार श्रीमती बांगर यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी कार्तिक सावंत, नेत्रा महाजन, आस्था पातकर, निधी सावंत, सानिया पानसरे, नीलम पातकर, धनश्री महाजन, सानिया आतार, मिनाज अत्तार यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.
 
या कार्यक्रमात प्रथमेश सावंत, रोहित झुंजारराव, अरुण भांडे, प्रमोद भोईर यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. सर्वानी एकमत होऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

No comments