web-banner-lshep2024

Breaking News

आंध्रप्रदेशच्या फार्मा कंपनीत स्फोट; 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 36 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू


नवी दिल्ली:आंध्रप्रदेशच्या ( Andhra Pradesh News) अनाकापल्ले जिल्ह्यात एका फार्मा कंपनीत बुधवारी दुपारी साधारण 2.15 आग लागली होती. या अपघातात सुरुवातीला 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशीरा प्रशासनाने 17 जणांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. 

ही घटना अच्युतापुरम SEZ स्थित फार्मा कंपनी एस्किएंटियाच्या प्लांटमध्ये झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कंपनीच्या रिएक्टरजवळ आग दिसली, यानंतर मोठा ब्लास्ट झाला. यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कारण आग लागली तेव्हा कंपनीत 381 हून जास्त कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करीत होते. घटनेवेळी अधिकतर कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सॉल्वेंट ऑईल पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पंप केला जात होता, तेव्हा गळती झाली आणि आग लागली. यामुळे 500 किलोलीटरच्या कॅपेसिटर रिएक्टरमध्ये स्फोट झाला.

 

No comments