Gold Rate Today : बजेटनंतर राज्यभरात घसरलं सोनं, मुंबईत तर 5900 रुपयांनी स्वस्त
मुंबई:Gold Silver Price Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी 6 टक्के कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. या घोषेनंतर काही तासांमध्येच सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Price in India) मोठी घसरण झाली आहे. मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे.
मुंबईकरांना मोठा दिलासा
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत प्रती तोळा 5900 रुपये सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात 7600 रुपये प्रती किलो घसरण झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही सोन्याचे दर 2 हजारांनी कमी झाले आहेत.
नाशिकमध्ये सोमवारी सोन्याचा दर प्रती तोळा 72800 रुपये होते.
तो आज (मंगळवार, 23 जुलै) 69500 रुपये झाला आहे. अर्थसंकल्पानंतर जळगाव
सुवर्णनगरी सोन्याचे भाव प्रती तोळा 70 हजार 700 रुपये तर चांदीचा भाव 87
हजार किलो इतका झाला आहे. सकाळी अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा भाव 73 हजार
200 तर चांदीचा भाव 89 हजार 500 रुपये इतका होता. जळगावमध्ये
अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या भावात प्रत्येकी 2 हजार 500 रुपयांची
घसरण झाली आहे.
बीडमध्ये यापूर्वी सोन्याचा दर 72300 रुपये होता. तो बजेटनंतर 70,500
रुपये झाला आहे. वर्ध्यामधील एक तोळा सोन्याच्या दरात 74,000 रुपयांवरुन
71,300 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.



No comments