विशाळगड हिंसाचाराची ' सीआयडी ' चौकशी करा - आमदार रईस शेख
मुंबई : विशाळगड आणि परिसरात हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या हिंसाचाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी. या हिंसाचारातील दंगेखोरांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे. आणि पिडीतांना १५ दिवसाच्या आत नुकसाभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाव्दारे केली आहे. आमदार शेख यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विशाळगड हिंसाचार प्रकरणाची चर्चा केली आणि त्यासंदर्भातले आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यासंदर्भात बोलताना आमदार शेख म्हणाले की, विशाळगड आणि पायथ्याच्या परिसरातील अतिक्रमण बाब न्यायप्रविष्ठ आहे. तरीसुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी 'चलो विशाळगड' अशी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांची हाक होती.१४ जुलै रोजी विशाळगड पायथ्याशी गाजीपुर गाव आणि मुस्लिम वाडीवर हल्ला करण्यात आला. मुस्लिम समुदायाची घरे, दुकाने आणि मोटार गाड्यांची जाळपोळ आणि नासधूस करण्यात आली.



No comments