टायफाईड मलेरिया साथीचे आजार टाळण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांची स्वच्छता मोहीम पाणी शुद्धीकरण
नामदेव शेलार / मुरबाड : सर्वत्र टायफाईड मलेरिया झिका अशा साथीच्या रोगाचा फेलाव सुरू आहे त्याची लागण मुरबाड शहरात होऊ नये यासाठी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आहे.आरोग्याची साथ टाळण्यासाठी मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांनी पाणी शुद्धीकरणास सुरुवात करून नागरिकांना पाणी उकळून गाळून प्यावे घराच्या आवारात पाणी साठवून ठेवू नये घरात स्वच्छता ठेवा डेंगू चिकनगुनिया मलेरिया टायफाईड आजारावर मात करण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीने जनजागृती मोहीम सुरू केली आहे मोहिमेमध्ये आरोग्य विभागासह सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मुरबाड शहरातील प्रमुख नाला एमआयडीसी नाला म्हसा देवदर्शन जोगेश्वरी आळी प्रमुख नाले संपूर्ण 17 प्रभागांमधील गटारीची साफसफाई केली आहे त्यामुळे पहिल्या पावसात शहरात पूर परिस्थिती उद्भवली नाही शहरांमधील सर्व रस्ते गटारी पावसाळ्यापूर्वी तयार करून दरवर्षी मुरबाड शहरात पूर परिस्थिती निर्माण होत असे त्यावर मात झाली आहे.
मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या पारदर्शक कारभारामुळे मुरबाड नगरपंचायत मधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला जात आहे जन्ममृत्यू नोंदणी दाखले रहिवासी दाखले तात्काळ दिले जातात मुरबाड नगरपंचायतीचे अधिकारी देशपांडे,देवकर,देशमुख ,डोहळे ,तेलवणे,इंजिनियर,पवार ,जाधव ,शिंदे,गडगे,देसले,घोडके या प्रमुख अधिकारी कर्मचारी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता आरोग्य जनजागृती अभियान राबवत आहेत नागरिकांनी आपला घर परिसर स्वच्छ ठेवावा रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन करून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुरबाड नगरपंचायतीला स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिल्याने शहरातील पाणीपुरवठा योजना ,विद्युतीकरण, रस्ते,गटारी, प्रमुख नाले,गार्डन,चौक सुशोभीकरण अशी अनेक कामे मार्गी लागली आहेत नव्याने अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.




No comments