web-banner-lshep2024

Breaking News

Ananta Radhika Wedding | पीएम मोदींसह ते सीएम ममता पर्यंत अंबानी कुटुंबियांच्या लग्नात सहभागी झालेल्या वरिष्ठ नेत्यांचा व्हिडिओ आले समोर..


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याच्या चर्चा अनेक महिन्यापासून सुरू आहेत या लग्नाला देश-विदेशातील अनेक खास पाहुणे उपस्थित होते या लग्नाला देशातील अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांचे व्हिडिओ समोर आले आहे याच व्हिडिओमध्ये लग्नात सहभागी झालेले अनेक नेते दाखवण्यात आले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला अंबानी कुटुंब प्रंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना दिसत आहे अनंत आणि राधिका ने प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतले.

        आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यूपी चे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ही व्हिडिओमध्ये दिसत आहेत यासोबतच प्रफुल पटेल उपमुख्यमंत्री पवन कल्याण गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

      या लग्नाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार आणि काँग्रेस नेते सचिन पायलट हे देखील उपस्थित होते.एएनआय या वृत्तसंस्थेवर या सर्व नेत्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

No comments