मुरबाड रेल्वेसाठी 1300 कोटी रुपये निधी केंद्राकडे मागणार;खासदार सुरेश(बाल्यामामा)म्हात्रे यांची मुरबाडकरांना आश्वासनपूर्ती..!
नामदेव शेलार / मुरबाड : निवडणुकीच्या अगोदर मुरबाडमध्ये चॉकलेट वाटप करून गाजराची टोपली हातात घेऊन मुरबाड गाजराची रेल्वे म्हणणारे बाल्यामामा म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वेसाठी केंद्राकडे तेराशे कोटी रुपये मागणी केली असल्याची आश्वासनपूर्ती मुरबाडकरांची संवाद साधताना केली आहे मागील दहा वर्षात माजी केंद्रीय मंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली केवळ 200 कोटी रुपये मागणी केली मात्र जमीन भूसंपादन 24 किलोमीटर असल्याने शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी भरीव निधीची गरज असल्याचे सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे यांनी मुरबाड शिवनेरी विश्रामगृहात झालेल्या संवाद कार्यक्रमात केले आहे.
येत्या पहिल्याच अधिवेशनात मुरबाड रेल्वे मार्गी लावण्यासाठी आवाज उठवणार असल्याचे बाल्यामामा म्हात्रे यांनी सांगितले. दर महिन्याला जनता दरबार भरवणार असून अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक बोलवणार आहेत मुरबाडकरांच्या विविध समस्यांचे निवेदन यावेळी बाल्यामामा यांना दिले मुरबाड तालुक्यात जलजीवन पाणीपुरवठा योजनेत कामे अपूर्ण असताना निधी हडप केल्याच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक रस्त्यांची कामे न करता बिले काढली आहेत त्याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याचे सांगितले लोकसभेत म्हात्रे यांना भाजपाच्या अदृश्य शक्तीने मदत केल्याची चर्चा आहे त्यांना येत्या विधानसभेत मदत करणार काय यावर बाल्यामामा म्हात्रे गोंधळले मला मदत केली असती मग भाजपा आणि अपक्षांना एवढं मोठे मतधिक्य कसे पडले मला अदृश्य शक्तीने मदत केली नाही असं म्हणताना शब्द पुन्हा फिरवून प्रत्यक्ष नाही परंतु अप्रत्यक्ष मदत केल्याची कबुली बाल्यामामा म्हात्रे यांनी दिल्याने येत्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण मामा कोणाच्या मदतीला धावणार हे गुलदस्त आहे.
मुरबाड कल्याण रस्त्याची खड्डेमय वाटचालीवर नागरिकांनी लक्ष वेधले असता अधिकारी ठेकेदारांना सूचना केल्याचे सांगून आरोग्य औद्योगिक वसाहत पाणी रस्ते समस्यावर माहिती घेऊन बोलेन समस्या सोडविन अशी माहिती दिली. यावेळी इंडियाआ घा गाडीचे पदाधिकारी उपस्थित होते रामभाऊ दुधाळे यांनी प्रास्तावित केले.यावेळी रवींद्र चंदने, आप्पा घुडे ,संतोष विशे,दीपक वाकचौरे ,बाळा चौधरी,मामा चे पीए,धीरज म्हात्रे,चेतनसिंह पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.पडघा परिसरातील वाशेरे,तळवली, भादाने,आतकोली,चिराडपाडा परिसरातील गुरेचरणाच्या जागेत कचरा डेपोसाठी शासनाची जमीन देण्यात येऊ नये त्या जागी शासकीय कार्यालय गोडाऊन प्रकल्प उभारावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.


No comments