web-banner-lshep2024

Breaking News

जीवितहानी आणि वित्तहानी टाळा वडखळ पोलिसांचे आवाहन


पेण : नुकतीच पावसाळ्याला सुरूवात होत असुन शेतकऱ्याने शेतामध्ये जाऊन शेतीची मशागत आणि पेरणीला सुरुवात केली आहे. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये त्याचप्रमाणे वित्तहानी होऊ नये, यासाठी पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठण्याचे पो.नि. प्रसाद पांढरे यांनी आवाहन केले आहे.

पहील्याच पावसात ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाउस होतो तेव्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असतो. ही विज पडण्याची प्रक्रिया असते ती उंच ठिकाणी म्हणजेच शेत,विद्युतशी निगडित शेतातील झाड, पोल किंवा विद्युत वाहिन्यांवर विज पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुसळधार पाऊस पडत असेल तर अशा ठिकाणी न राहता शेतामध्ये असणाऱ्या खोपट्यात जमिनीवर न उभे राहता एखादा प्लास्टिक किंवा सुक्या लाकडावर दोन्ही पाय जवळ घेऊन मान खाली घालून आणि कानात कापसाचे बोळे भरून डोळे बंद करून राहावे असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ न ठेवता आपत्ती व्यवस्थापनाने जो अॅप तयार केला आहे. तो अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ज्यावेळी या अॅप द्वारे विज पडण्याचा संदेश दर्शवला जातो त्यावेळी ही सर्व खबरदारी घेउन नंतर मोबाईल बंद करून आपली जीवित हानी आणि वित्त हानी टाळा अशा प्रकारचे मोलाचे आवाहन वडखळ पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रसाद पांढरे यांनी केले आहे.

No comments