मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम;राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नामदेव शेलार / मुरबाड : आयोध्या मध्ये 22 जानेवारीला पार पडत असल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत मंदिरे रुग्णालय सार्वजनिक ठिकाणी येथे स्वच्छता मोहीम राबवून भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोध्या मध्ये 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा दिनी प्रत्येक घरात दिवे लावून उत्साह साजरा करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 51 हजार पणत्यांचे वाटप केले आहे.
सोबत राम जन्मभूमीची संपूर्ण माहिती देऊन अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा आनंद उत्सव साजरा करण्याचे आहवान सर्वांना करण्यात आले आहे. मुरबाड विधानसभा क्षेत्रात रस्ते पाणी योजना इमारती अन्य विकास कामांचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडत आहे राम मंदिराच्या आवारात साफसफाई करून बदलापुरात भव्य रॅली शोभा यात्रेचे आयोजन आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. विधानसभा क्षेत्राच्या कल्याण मुरबाड बदलापूर परिसरात कार्यकर्ते नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावून दीपोत्सवाचे आयोजन केले आहे.
तालुक्यामधील पर्यटन स्थळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वच्छता करून रुग्णालय मंदिरे शाळा कॉलेज ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन मार्गदर्शन करण्यात आले आहे 22 जानेवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग आहे शहरांमध्ये आकर्षित विद्युत रोषणाई तसेच नागरिकांनी आपल्या घराला सजावट करून राम चरित्र गाथांचे ठिकठिकाणी वाचन सुरू केले आहे राम नाम सप्ताहाच्या उत्साहाने सर्वत्र बाजारपेठा सजले आहेत भगवे झेंडे दुकानात झळकू लागले आहेत धार्मिक सामाजिक एकता जोपासून सर्वांनी एकत्र यावे असे आहवान आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.


No comments