web-banner-lshep2024

Breaking News

Pramod Hindurao | ठाण्याच्या दहशतवादापासुन आमची सुटका पक्षाला मदत करतो म्हणजे लोकाना वार्‍यावर सोडणार नाही - प्रमोद हिंदुराव

 

नामदेव शेलार / मुरबाड : चांगली विकासीत कामे करण्यासाठी अजित दादा पवार भाजपा शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत शाहुफुले,आंबेडकराचे विचार सरणी सोडली नाही शरदचंद्र पवार यांनी देशासाठी राज्यासाठी एकत्र येण्याची भुमिका घेतली होती तिच भुमिका साकारण्यासाठी सरकार मध्ये सामील झालो असे उदगार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कार्यकर्ता बैठकीत काढले आहे.

  आम्ही एकत्रच आहोत शरदचंद्र पवार आमचे दैवत आहेत आमचा पक्ष एकच आहे असे सांगुन दुसरी कडे ठाण्याच्या दहशतवादापासुन आमची सुटका झाली असा गौपस्फोट प्रमोद हिंदुराव यांनी करून ठाण्यात कोणाचा दहशतवाद त्याचं नांव सांगण्यास हिंदुराव यांनी टाळले.

 ग्रामीण भागात वाढती बेरोजगारी आदिवासी समाजाचे विविध प्रश्‍न मुरबाड रेल्वे अपुर्ण प्रकल्प विकासकामे यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत मात्र लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन हात करण्याची वेळ आल्यास तेही करू पक्षाला मदत करतो म्हणजे आम्ही लोकाना वार्‍यावर सोडणार नाही अशा प्रखट शब्दात प्रमोद हिंदुराव यांनी आपली भुमिका मांडली आहे.

 विकासासाठी एकमत होत असेल तर पुढील निवडणुका लोकांसाठी एकत्र लढु नाहीतर आम्ही सेफ आहोत आमचा चेहरा अजितदादाच नव्हे शरद पवार आहेत राष्ट्रवादीपक्ष एकसंघ आहे.प्रशासनात पारदर्शकता आणुन ग्रामीण भागात जनता दरबार भरवणार आहोत.लवकरच अजितदादा यांचा मेळावा मुरबाड विधानसभा भिवंडी लोकसभेतील ठिकाणी होणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले.

मुरबाड रेल्वेला अजितदादा पवार यांनी 400 कोटीच्या निधी मंजुर केलेला आहे केंद्र सरकार कडुन 400 कोटी असा 800 कोटी रूपये निधी मिळणार असुन मुरबाड रेल्वेचा मार्ग मोकळा होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

 

No comments