web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड कुडवली एमआयडीसी मधील अपोलो पाईप कंपनीत कामगाराचा मृत्यु कामगाराची सुरक्षा वार्‍यावर....!

मुरबाड : नामदेव शेलार : मुरबाड कुडवली येथील एपीएल अपोलो पाईप कंपनीमध्ये एका कामगाराचा मशनिरी मध्ये चिरडुन मृत्यु झाला आहे त्याची माहिती लपवण्यासाठी कंपनीचा मॅनेजर पसार झाला आहे.कुडवली एमआयडीसी मधील एपीएल अपोलो स्टिल पाईप मध्ये शेकडो कामगार कंत्राटी पध्दतीने 12 तास काम करतात त्यांना अल्प प्रमाणात वेतन देवुन कोणत्याही सोयीसुविधा सुरक्षा नाहीत कामगाराना मिळणारी कामगार विमा योजनाचे पैसेही बोगस डॉक्टराच्या मदतीने कंपनी मॅनेजर लाटत असल्याचे या अपघातावरून समोर आले आहे.

  येथील कारखाना मधील कामगाराचे असे अनेक अपघात पोलिसाच्या तपासा अंती दडपले गेल्याने मॅनेजर कंपनी मालक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही येथील एमआयडीसी मधील कारखानदार असोसिएशन स्थानिक पोलिस लोकप्रतिनिधी ठेकेदार संबधित प्रशासनाच्या संगणमतानी मृत्यु जखमी झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांना विमा पॉलीसीप्रमाणे भरपाई दिली जात नाही.

अपघात दडपले जातात स्थानिकाना कामावर घेतले जात नाही परप्रांतियाना नोकर्‍या दिल्या जातात पोलिसांना याचं कंपनीने चेक नाक्यावर लावण्यासाठी लोखंडी गेट दिले आहेत स्थानिकांना निधी दिला जातो त्यामुळे कंपनीमध्ये मृत्यु झालेले संताला यादव याच्या मृत्युला कारणीभूत असलेल्यावर पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

  एपीएल अपोलो स्टील कंपनीमध्ये शेकडो ट्रक लोखंडी पत्रा घेवुन रात्र दिवस येतात त्यांच्यावर सुध्दा कारवाई होत नाही कंपनीचे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता मॅनेजर कंपनीतुन कुठे गेला आहे त्याची माहिती नसल्याचे कंपनीचे सुपरव्हायजर जाधव यांनी सांगितले.

 

No comments