मी न सांगता केलं आणि सर्वांच्या भावना दुखावल्या या बद्दल मी माफी मागतो - अजित पवार
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी
आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ एकच उडाली होती. दरम्यान,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुध्दा हालचालींना वेग आला. शुक्रवारपासून ते
माध्यमांपासून दूर होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली.
मात्र आज 19 तासांनंतर ते माध्यमांसमोर आले आहेत. त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे.
माझ्या राजीनाम्यामुळे नेते व्यथित झाले. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
विवेकबुद्धीमुळे राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.अजित पवार बोलताना म्हणाले की, ज्या वेळी असा प्रसंग आता. त्यावेळी मी
कोणाला विचारले असते तर त्यांनी राजीनामा नको देऊ असा सल्ला दिला असता. ही माझी
चूक होती की काय होते याच्या खोलात मी जात नाही. जे मी न सांगता केलं आणि
सर्वांच्या भावना दुखावल्या या बद्दल मी माफी मागतो.25 हजार कोटींचा घोटाळा झाला
म्हणतात मात्र बँक नफ्यात आहे, घोटाळा झाल्यावर बँकेला नफा कधी होतो का? असा
सवालही अजिपवारांनी विचारला. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, 100 कोटीपेक्षा
जास्त रक्कम असल्याने साहजिकच ईडीकडे प्रकरण गेलं, पण पवार साहेबांचा काडीचाही
संबंध नाही. माझ्यामुळे त्यांचं नाव समोर आलं यामुळे मी अस्वस्थ झालो होतो.
माझ्यामुळे साहेबांची बदनामी झाली यामुळे मला वाईट वाटलं. अजित पवार बोलताना
म्हणाले की, विधानसभाध्यक्षांना तीन दिवसांपूर्वीच ते मुंबईत कधी येणार असल्याचे
विचारले होते. निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सहकाऱ्यांना अडचणीत येऊ नये.
आपल्यामुळे त्यांना अडचणीत आणणे योग्य नाही ही भावना माझ्या मनात होती. यामुळे
राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या संचालकीय मंडळावर सर्व पक्षाचे लोक
होते, 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला, ज्या बँकेत एवढ्या ठेवीच
नाहीत, त्यापेक्षा जास्त रकमेचा घोटाळा त्या बँकेत कसा होऊ शकतो असा सवालही अजित
पवारांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, राजकीय जीवनात सहकारी संस्था आजही
आम्ही सुरळीतपणे चालवण्याचे काम करत आहोत. अनेक दिग्गज नेत्यांनी या संस्थांमध्ये
कामे केली आहेत. या काळातही कारखाने कोणत्याही किंमतीत विकले ते पाहिलं तर
परिस्थिती लक्षात येईल असेही ते म्हणाले.


No comments