web-banner-lshep2024

Breaking News

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
जम्मू-काश्मीर येथील श्रीनगर महामार्गावर रामबान जिल्ह्यात बटोटे गावामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या तिघांनी शनिवारी सकाळी एका नागरिकाला बंधक बनवले होते. त्यानंतर येथे चकमकीला सुरुवात झाली. जवानांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात होते. या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आणि बंधकाची सुखरूप सुटक करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र या चकमकीत एका एक जवान शहीद झाला आहे.

No comments