web-banner-lshep2024

Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या व अंडी

BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह -  सांगली ।
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने कोंबड्या फेकत आंदोलन केले. पलूस तासगाव मार्गावर दबा धरून बसलेल्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. मुख्यमंत्र्याच्या बससमोर फेकल्या कोंबड्या कडकनाथ घोटाळ्या प्रकरणी स्वाभिमानी कडून हे आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतील वाहनांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आला. ताकारी ते कुंडल या मार्गावरील दह्यारी फाट्यानजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन गनिमी काव्याने ताफ्यासमोर येत अंडी आणि कडकनाथ कोंबड्या फेकल्या.अचानकपणे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर येऊन वाहनाच्या ताफा रोखून अंडे आणि कोंबड्या फेकल्याने पोलीस यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. राज्यात गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करावी. तसेच सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी द्यावे आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

No comments