web-banner-lshep2024

Breaking News

अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी केला भाजपमध्ये प्रवेश

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपस्थित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पुण्यातील विमानतळावरून उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाले होते. महाजनादेश यात्रेवर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदयनराजे भोसले यांना घेण्यासाठी पुणे विमातळावर पोहोचले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजेंच्या या भेटीच्या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचीही उपस्थिती होती.

No comments