web-banner-lshep2024

Breaking News

माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे |
जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. सोमवारी सकाळी कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात संरक्षक भिंत व भूस्खलन झाले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक सोमवारी पूर्णपणे थांबवण्यात आली. कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. या घाटातील सावर्णे गावापासून जवळच ८५/६०० क्रमांकाची रस्त्याच्या कडेची संरक्षक भिंत पडली आहे. याशिवाय, भूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावर पडला. रात्र असली तरी जीवितहानी झाली नाही. ट्रॅफिक पोलीस व बीटमार्शल यांच्या सतर्कतेने घाटातील वाहतूक नियंत्रणात आणून घटनेच्या ठिकाणी बचावात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या.

No comments