web-banner-lshep2024

Breaking News

राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तिथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोल्हापूर सांगली, साताऱ्यातील पूरपरिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विविध भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित केली होती. बचावकार्यात अडथळा नको म्हणून तिथे जाणं टाळलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तिथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी अशा सुविधा पुरवण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

No comments