web-banner-lshep2024

Breaking News

कोल्हापूर-सांगली महापूरः गरज भासल्यास एअर लिफ्टिंग करु- मुख्यमंत्री फडणवीस

BY - युवा महाराष्ट्र लाइव - कोल्हापूर |
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पुराची हवाई पाहणी केली. सर्वांत भीषण परिस्थितीही सांगलीची असून तिथे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सांगलीत बोट उलटून पाण्यात बुडालेल्या तसेच पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्यां कुटुंबियांना सरकारतर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. तसेच पश्चिम महाराष्टात योग्य वेळ आल्यास राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

No comments