ठाण्यात चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ, विवाहितेची आत्महत्या
BY - मन्साराम वर्मा,युवा
महाराष्ट्र लाइव – ठाणे |
वारंवार चारित्र्यावर संशय
घेत विवाहितेला मारहाण होत असल्याने या जाचाला कंटाळून प्राजक्ता व्यवहारे या महिलेने
आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी
केला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनीआत्महत्येचा गुन्हा दाखल करत पतीला
अटक केली असून सासू ननंद आणि तिच्या पतीच्या शोध सुरू आहे
कल्याण
पूर्वमधील नांदीवली परिसरात राहणाऱ्या प्राजक्ता सागर व्यवहारे या महिलेचा मृतदेह तिच्या
घरात किचनमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिला एक तीन महिन्याची मुलगी आहे.
प्राजक्ताचा मृतदेह कोलशेवाडी पोलिसांनी जे जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनसाठी पाठवला
होता. प्राथमिक अहवालात प्राजक्ताने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रजक्ताच्या
कुटुंबाचा आरोप आहे प्राजक्ताचा पती सागर सासू, सासरे, नणंद, आणि तिचा पती हे सर्व
प्राजक्ताला नाहक त्रास देत होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेत सहा महिन्यांपासून
तिला मारहाण सुरू होती. काल सागरचा फोन आला त्याने स्पष्ट सांगितले होते की प्राजक्ताला
तुम्ही घरी घेऊन जा नाही तर मी तिला मारून टाकेन. आणि काहीच तासात तिच्या मृत्यूची
बातमी आली ही आत्महत्या नसून हत्या आहे. असा आरोप प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी केला
आहे.



No comments