web-banner-lshep2024

Breaking News

६०० किलो गोवंशीय मांसासह दोघेजण अटक

BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६०० किलो गोवंशीय मांसासह दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक - मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने एका अज्ञात वाहनामधून गोवंशीय मांस वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून कोनगाव पोलिसांना मिळाली या मिळालेल्या माहितीच्या आधारावर कोनगाव पो. ठाण्याचे वपोनि रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बोराटे, गुन्हे प्रकटीकरण पथे, पोहवा शिंदे, पोना पवार, चालक पोना साळुंखे यांनी बासुरी हॉटेल, मुंबई - नाशिक महामार्ग भिवंडी या ठिकाणी संशयित वाहनावर सापळा लावून MH. 05. AS.7798 महिंद्रा झायलो हे वाहन ६०० किलो गोवंशीय मांसासह ताब्यात घेतले. तसेच सदर वाहनाचा चालक इरशाद हुसेन शेख आणि त्याचा साथीदार नफिस अहमद सयद या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपयुक्त परि - ०२ भिवंडी, सपोआ पूर्व विभाग भिवंडी, वपोनि कोनगाव यांच्या मार्दर्शनाखाली मपोउपनि राऊत करत आहेत.

No comments