जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी जनतेचाच - प्रभुनाथदादा भोईर (नगरसेवक)
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे
कल्याण गांधारी परिसरातील रुतु रिव्हर इस्टेट यातील सोसायटीच्या पिण्याच्या पाण्याच्या
टाक्यांमध्ये पुराचे पाणी जमा झाल्यामुळे टाक्यांमध्ये मिसळलेल्या दुषित घटकांमुळे
सद्य स्थितीत ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्यामुळे स्थानिक नगरसेवक श्री.प्रभुनाथदादा
भोईर यांनी घरोघरी जाऊन पिण्याच्या पाण्याचे २० लिटरचा जार दोनशेहून अधिक कुटूंबांना
जार वाटप केले. व तसेच नगरसेवक श्री.प्रभुनाथ दादा भोईर यांचे नागरिकांनी आभार मानले.
नेहमी मदतीसाठी पुढाकार घेणारे नगरसेवक प्रभुनाथ भोर्इर नागरिकांच्या सेवेसी तत्पर असतात.त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आज नागरिकांच्या मनात दादांनी आपले घर निर्माण केले असून गोरगरिबांच्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी कसलीही पर्वा न करता सामाजिक सलोखा आणि माणूसकी जपत आपले कर्तव्य पार पाडत असल्याने प्रभुनाथ दादा भोर्इर यांच्याकडै येणार्या प्रत्येक नागरिकांना सहकार्य आणि मदत मिळत असल्याने असाच असावा नगरसेवक जो नागरिकांच्या सेवेला धाऊन येतो असे नागरिकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.जगात आलोय तर सेवेसाठी आणि सेवा करण्याचे जे भाग्य मला लाभले त्याचे अभिमान वाटत असुन जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी जनतेचाच आहे असे नगरसेवक प्रभुनाथ दादा भोर्इर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

No comments