कोल्हापूरात आज जोरदार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी
BY - युवा महाराष्ट्र
लाइव - मुंबई
|
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात
पावसाने हाहाकार माजवला आहे. सांगली कोल्हापूरातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहे.
अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. येथील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र
शुक्रवारी पुणे, सातारा, कोल्हापूरात आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने
वर्तवली आहे. दरम्यान येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून 9 ऑगस्ट रोजी
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होईल. असा इशारा भारतीय हवामान
शास्त्र विभागाने दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. नद्या
कोपल्या आहेत. दरम्यान पावसाने मुंबईत मात्र जराशी विश्रांती घेतली आहे. गुरुवारी
तुरळक ठिकाणी कोसळलेल्या सरी वगळता पावसाने दिवसभर मुंबईकडे पाठच फिरवली होती.
मात्र 9 ऑगस्ट रोजी मुंबईत हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने
वर्तवली आहे.



No comments