मोहोळ तालुक्यातील भीमा नदीला महापूर आल्याने गावात पाणी शिरले
BY - यासीन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
भीमा नदीला पुर आल्याने मोहोळ तालुक्यातील अनेक
गावांमध्ये पाणी घुसल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे
नदीकाठच्या गावातील नागरीकांना साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.
त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांना व्हॅक्सीनेशन ची लस
देण्याची मागणी शिवसेना उप तालुका प्रमुख नागेश वनकळसे यांनी केली आहे. सध्या मोहोळ तालुक्यातील मिरी, अर्धनारी,
अरबळी, बेगमपुर या गावांना भीमा नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे.
त्यामुळे मोहोळ शिवसेनेना पुरग्रस्तांना मदतीसाठी सरसावली आहे. गुरुवारी शिवसेना
तालुका प्रमुख अशोक भोसले, उप तालुका प्रमुख नागेश वनकळसे, आप्पा पाटील, सिद्धाराम
म्हमाणे यांनी पुरग्रस्त गावांना भेट देवून मदतकार्य सुरु केले. यावेळी पुरस्थिती
पाहता साथीचे रोग पसरण्याची भीती जास्त असल्यामुळे नागरीकांना थंडी ताप येण्यास
सुरुवात झाली आहे. डेंग्यु चा प्रादुर्भाव होण्याची भीती अधिक असल्यामुळे जिल्हा
प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमांतून नागरीकांना व्हॅक्सीनेशन च्या
लसचा डोस देण्याची मागणी वनकळसे यांनी केली आहे. यावेळी पुरग्रस्तांनी आपल्या
अडचणी सेना पदाधिकाऱ्यांना सांगितल्या.दरम्यान आरोग्य प्रशासनाने नागरीकांना पाणी
उकळून प्या, कोरड्या जागी झोपा, उघडे व शिळे अन्न खाऊ नका असे अवाहन केले आहे.



No comments