एक देशी बनावटीचे गावठी पिस्तोल, एक जिवंत काडतुस 2 आरोपी अटक
BY
- सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
आज रोजी स्था.गु.शा. पुणे ग्रामीण
कडील पो. अधिकारी व स्टाफ असे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत आगामी दहीहंडी सणानिमीत्त
पेट्रोलींग करत असताना दोन इसम कान्हे फाटा येथे गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री करिता
येत असल्याची बातमी मिळालेने स्था.गु.शा. कडील स्टाफ यांनी पंचासह
१४.३० वाजता छापा कारवाई केली असता कान्हे फाटा येथील हाॅटेल सिंध पंजाब चे समोर दोन
संशयितास ताबेत घेऊन नाव, पत्ता विचारता १) अनिस चांदभाई शेख, वय २९ वर्षे रा. केशवनगर,
रेल्वे गेट पलीकडे, महालक्ष्मी मंदीराजवळ, वडगाव ता. मावळ व २ )राम दशरथ माने, वय ३२
वर्षे रा.विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी, कामशेत, ता. मावळ अशी असुन त्यांची अंगझडती
घेतली असता एक देशी बनावटीचे गावठी पिस्तोल, एक जिवंत काडतुस व मोबाईल असा एकुण ५०१००/-
रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन पुढील कारवाई करिता वडगाव मावळ पोलीस स्टेशनकढे
पाठविण्यात आली आहे.



No comments