web-banner-lshep2024

Breaking News

रायता पुल धोकादायक;सरकार महाड दुर्घटनेची वाट पहातंय..?

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

गेल्यावर्षी पावसाळयात महाड पुल दुर्घटना घडली त्यावेळी राज्यातील जुन्या पुलाचा सर्व्हे करण्यात आला होता त्यामध्ये कल्याण मुरबाड नगररस्त्यावरचा रायता पुलाचा समावेश होता.परंन्तु सरकारने रायता पुलाचे गांर्भीय लक्षात घेतले नाही नवीन पुल बांधला नाही परिणामी येत्या 26 जुलैच्या पावसात रायता पुल खचल्याने पुढचा एक भाग वाहुन गेला. कल्याण-मुरबाड-नगर रस्ता बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले याकडे सरकार दुर्लक्ष का करते 
(महाड दुर्घटना फोटो)
पुन्हा महाड सारखी दुर्घटना घडल्याची वाट पहातात काय? असा सवाल येथील नगरिकांनी केला आहे.नगर आळेफाटा औतुर पुणे या मार्गातुन मुरबाड वरून कल्याण,मुंबर्इ अन्य ठिकाणी जाण्यासाठी रायता पुल हा एकमेव मार्ग आहे.ही नदीवर बारवी डॅम व बदलापुर डॅम असे दोन मोठे धरणे असल्याने उन्हाळा पावसाळ तेवढाच पाणीसाठा असतो प्रचंड खोल आणि डळमळीत झालेला पुल इंग्रजकाळातील असुन इंग्रजांनी हया पुलाची मुदत संपल्याचे पत्र महाराष्ट्र सरकारला काही वर्षापुर्वी दिले आहे.मात्र छोटी मोठी डागडुजी करून पुलाचा वरची मलमपट्टी करून प्रवाशांच्या जीवनाशी खेळ संबधित यंत्रणेने खेळला आहे.रायता नदीचा पुल दरवर्षी पाण्याखाली जातो परंन्तु हया पुलाला आता मोठा धोका निर्माण झाला आहे.त्याचे कारण मुरबाड बारवी डॅमची उंची वाढवल्याने बारवीडॅम मधील वाढत्या पाणीसाठयाने धरणाचा पाणी नदीत सोडण्याशिवाय पर्याय नाही असाच फटका 26 जुलैच्या पावसाने रायता नदीचा पुल खचवला शेकडो गांवाचा कल्याण-मुरबाड तालुक्यांचा कल्याण,ठाणे,मुंबर्इचा संपर्क तुटला आहे.कल्याण-मुरबाड-माळशेजघाट नॅशनल हायवे हा रस्ता चौपदरी होत असुन त्याचा टेंडर होऊन काम सुरू आहे.त्यामध्ये हा रायता पुल महत्वाचा केंन्द्रबिंदू असुन ठेकेदारानी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.रायता पुल बांधण्यासाठी परदेशी कंपनीची मदत लागण्याची शकेता असुन दोन वर्षे पुलाचे काम पुर्ण होणार नाही.त्यामुळे मुरबाडकराना पर्यायी रस्ते बदलापुर डॅम तसेच गोवेली शहाड कल्याण असा प्रवास करावा लागणार आहे.मात्र टिटवाळा,गोवेली,आंबिवली, मोहने येथील रस्ता भरपावसात पाण्याखाली जातो तसेच बारवीडॅम मार्गावरही काही मोरव्यावर पाणी साचतंय त्यामुळे मुरबाड करांची कोंडी झाली आहे.सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

No comments