web-banner-lshep2024

Breaking News

पुराच्या पावसाने दरवर्षी बंद होणारे रस्ते समृध्द व्हावेत

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
दरवर्षी पुराच्या पावसाने प्रमुख रस्ते बंद होतात गांवागांवाच्या संपर्क तुटतो याकडे विकासधिन भाजपा सरकारचं दुर्लक्ष झाले आहे.नुसते पुरहाणी पाऊस मनोरंजन म्हणुन नोंदलाजात असून अनेक रस्ते विकासाच्या नावाखाली ठेकेदारी राजकारण फंड वसुलीचे ठरत आहेत.वेडीवाकडी वळणे सकळभागात साचणारे पाणी कोसळणार्‍या दरडी शहरातील तुंबलेले नाले गटारी याकडे वर्षेभर दुर्लक्ष करून पावसाळयात आपत्कालीन नावाखाली बेजबाबदारी दडपण्याचा धंदा सत्ताधारी करत आहेत.ओट मिळते नोट जाते समस्या आश्‍वसनाच्या ओटावर असतात अशा राजकारणाला मतदाराही जबाबदार आहेत अशा भावना काही नागरिकानी व्यक्त केल्या आहेत.समृध्दी महामार्गासाठी शासनाने शेतकर्‍याच्या बळजबरीने घेतलेल्या जमिनी त्यातुन बनवलेले समृध्दी रस्ते त्याचं धर्तीवर दरवर्षी रस्त्यावर साचणारे पाणी रस्ते याचा पुर्नवसन झाले पाहिजे.ठाणे जिल्हयात ग्रामीण भागात अनेक गावांचा संपर्क तुटतो त्याचा फटका शालेयविद्यार्थी छोटे व्यापारी भाजीपालावाला शेतकरी तसेच भातशेती धारक शेतकर्‍यांना बसतो याकडे शासन आणि पुढारपणा करणारे कोणीही पहात नाही नुकत्याच झालेल्या 26 जुलैच्या पावसाने कल्याण बदलापुर शहापुर मुरबाड टिटवाळा भिवंडी वाडा आंबरनाथ उल्हासनगर मधील फुलेबाजार पेठेत आल्या नाहीत परिणामी पावसाने सुध्दा एकदिवस संपुर्ण ठाणे कोकणासह मुंबर्इ कडकडीत बंद पाळला एवढे खरे.


No comments