बारवी धरणात ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |
ठाणे जिल्ह्याची तहान भागविणारे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरले
आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.गेल्या अनेक दिवसांन
पासून मुरबाड आणि बदलापूर या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असंल्यामुळे बदलापूर जवळ असलेले
बारवी धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत 100 टक्के भरले आहे. या धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर,
कल्याण, डोंबिवली, ठाणे मीरा भाईंदर यासारख्या मुख्य शहरांबरोबरच औद्योगिक कारखान्यांना
पाणी पुरवठा केला जातो.बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार हे धरण शंभर टक्के भरलं आहे.
काल संध्याकाळी 5 च्या सुमारास हे धरण काठोकाठ भरले आहे. बारवी धरणाची
गेल्या वर्षीची (२०१८)ची क्षमता ही 68.60 मीटर होती. त्यानंतर या वर्षी (२०१९) दरवाचे लावून प्रथमच धरणाची उंची
4 मीटरने वाढवण्यात आली आणि ती 72.60 मीटरपर्यंत
करण्यात आली आहे.त्यामुळे यंदा बारवी धरणात अतिरिक्त (बोनस) पाणी साठा जमा होणार आहे.
तसेच धरणाच्या पाणी साठवण क्षमता गेल्या वर्षी (२०१८)पर्यंत 234 दश लक्ष घनमीटर इतकी होती. आता ही क्षमता वाढून
ह्या वर्षी (२०१९ ) पासून ती 340.48 दशलक्ष घनमीटर इतकी होणार आहे त्या मुळे साधारण
१०६ दशलक्ष घनमीटर इतकी वाढ होणार आहे ह्या वाढीव साठ्या मुळे पुढील १० ते १५ वर्षात
वाढणाऱ्या लोक संख्येला पुरेल एवढा पाणीसाठा होणार आहे





No comments