web-banner-lshep2024

Breaking News

अभिनेत्रीसोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ

BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोलकाता |
प्रवासादरम्यान महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोलकात्यात कॅब चालकाने अभिनेत्री स्वस्तिका दत्ता हिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याआधीही कोलकात्यात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे एकूणच महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अभिनेत्री स्वस्तिका बुधवारी (10 जुलै) मालिकेच्या शुटिंगसाठी कॅबने सेटवर जात होती. प्रवासादरम्यानच चालकाने स्वस्तिकासोबत गैरवर्तन केले आणि शिवीगाळही केली. त्यानंतर सीएन रॉय रोडवर 42 क्रमांक बस स्टँडच्याजवळ राईड रद्द करुन तिला जबरदस्तीने गाडीबाहेर काढले. यानंतर अभिनेत्री स्वस्तिकाने या घटनेबाबत फेसबुकवर लिहिले. पोलिसांनी स्वस्तिकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच कॅब चालक जमशेद हुसेन याला अटकही केली.

No comments