देवा ग्रुप फाऊंडेशन म्हणजे लाखो युवकांची प्रतिष्ठा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
आज महाराष्ट्रात नामवंत असलेली संघटना म्हणून देवा ग्रुप फाऊंडेशनचे नाव समोए येते.अशा संघटनांनी ज्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य,गोरगरिबांना मदतीचा हात देऊन अन्यायाविरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी थेट मंञ्यांशी भेट घेऊन सदरच्या विषयावर गांभिर्यरित्या दखल घेण्यासाठी मागणी करत पुढाकार घेतला आहे.अशा देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ ढोले व महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तथा देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वर्धा समभाव जपत जाती पातीला बाजूला सरून आज लाखो तरूणांना एकत्रित करून सत्याच्या मार्गाला नेऊन सामाजिक कार्यातून स्वतःला सिध्द करून देण्यात सिंहाचा वाटा म्हणजे देवा ग्रुप फाऊंडेशनचे आहे.काही शहारात खड्डे पडले त्यावेळीही देवा ग्रुप फाऊंदेशनच्या पदाधिकारी यांनी स्वःखर्चाने खड्डे भरून लोकनेत्यांना चांगलीच शिकवणही दिली.जेथे तेथे शिबीराचे आयोजन केले,नोकरीसाठी मार्गदर्शन कॅम्प,गरिबांच्या मुलांच्या शिक्षणांचा खर्च,स्वच्छता मोहिम अशा अन्य कार्याचा गवगवा झाला त्यामध्ये देवा ग्रुप फाऊंडेशनचे मुख्य भाग महत्वपुर्ण ठरले असुन वेळोवेळी सामाजिक कार्यातून युवकांनी जनसामान्यांची सेवा केली आहे त्यामुळे देवा ग्रुप फाऊंडेशन आज युवकांचे प्रतिष्ठेचे व्यासपिठ झाले आहे.अशा देवा ग्रुप फाऊंडेशनच्या धडाकेबाज कार्याला अलीकडे काहींनी बदनाम कारक प्रवृत्तीचे मॅसेज व्हायरल केले असून तानाजीभाऊ मोरे यांच्या कार्यप्रणालीवर शितोंडे उडवण्याचा प्रताप सुरू केला आहे.कधीही दुसर्यांना दुखःत न पाहणारा देवा ग्रुप फाऊंडेशनचे नाव काही भामटयांनी बदनाम करायला घेतले असून कदाचित आमच्या कार्याची जळण भामटयांना होत असेल अशा प्रतिक्रिया देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांनी आमच्याशी बोलतांना दिल्या.भुरटे चोर आणि त्यावर हे मोर असा टोलाही मोरे यांनी दिला.बदनामकारक मॅसेस व्हायरलमुळे महाराष्ट्रातील सर्व तरूणवर्ग एकवटला असून प्रतिष्ठीत व्यक्तीला बदनाम करणार्या अज्ञात भामटयावर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत असून पोलिस ठाण्यात अज्ञात भामटयाविरूध्द बदनामकारक मॅसेज व्हायरल केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे समजत आहे.
धरा बेच देंगे,गगन बेच देंगे,सुमन बेच देंगे,चमन बेच देंगे
अगर कलम के पुजारी सो गये,तो वतन के पुजारी वतन बेच देंगे
जी जनता देवा ग्रुप फाऊंडेशनचे नाव एैकले की आधारवड सांगते अशा जनतेच्या नावाचा वापर करत भामटयांनी पुढेपणा केला आहे.ज्या देवा ग्रुप फाऊंडेशनने दारूच्या भटया बंद करण्यात पोलिसांना मदत केली,मधधुंद करणार्याला व्यसनमुक्त केले,अशा देवा ग्रुप फाऊंडेशनला जोड जनतेनेच दिली त्यामुळे व्हायरल झालेला बदनामकारक मॅसेज कोणत्याही प्रकारे जनसामान्यांच्या मनातुन देवा ग्रुप फाऊंडेशन नाव नष्ट करू शकणार नाही कारण् जनतेनेच देवा ग्रुप फाऊंडेशनला आपले कुटूंबाचे सदस्य मानले असून एखादया प्रतिष्ठेला बदनाम करणार्या भुरटयांचाच शोध पोलिसांनी लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयातून,तालुक्यातून देवा ग्रुप फाऊंडेशनचे पदाधिकारी पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे प्रफुल सानप यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.



👍👍👍
ReplyDeleteJay deva 491
ReplyDelete1no.
ReplyDeleteधिरज गिल्लै
ReplyDeleteआडसुळ जिल्हा अकोला तालुका किल्ला
ReplyDelete