चरैवेति-चरैवेति या पुस्तकाच्या आसामी भाषेतील आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
चरैवेति चरैवेति हे केवळ पुस्तकाचे नाव नाही तर तो राज्यपाल राम
नाईक यांच्या शिस्तबद्ध आणि समर्पित जगण्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी गुवाहाटी (आसाम) येथे केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम
नाईक यांनी लिहिलेल्या चरैवेति-चरैवेति या पुस्तकाच्या आसामी भाषेतील आवृत्तीच्या प्रकाशनावेळी
ते बोलत होते. एका सर्वसामान्य माणसाचा राज्यपालपदापर्यंतचा प्रवास या पुस्तकाच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.आसाम आणि मिझोरामचे
राज्यपाल डॉ. जगदीश मुखी, मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय, अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल
डॉ. बी. डी. मिश्रा, सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री
सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.



No comments