आमदार शिवेंद्रसिंह राजेभोसले,संदीप नाईक आणि वैभव पिचड आमदारकीचा दिला राजीनामा
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राचं राजकारण
सध्या पक्षबदलाच्या लाटेनं ढवळून निघालंय. विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागायला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजेभोसले, वैभव पिचड, संदीप
नाईक, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत
जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. यातील शिवेंद्रसिंह राजेभोसले, कालिदास कोळंबर, वैभव
पिचड यांनी हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर संदीप नाईक लवकरच
आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.गणेश नाईकांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात
आहे. याचबरोबर नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 58 नगरसेवक भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असल्याची
चर्चा सुरू आहे.



No comments