web-banner-lshep2024

Breaking News

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती अमवास्येनिमित्त मोठी यात्रा

 BY - सुनिता कसबे,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |

राज्यभरारून आलेल्या लाखो भाविकांनी कुलदेवतच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सद्सनंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार च्या गजरात भाविक आपली वारी पूर्ण करताना दिसत आहेत. 
आज 12 वाजेपर्यंत च अमावास्येचा पुण्यकाल असल्याने सकाळी 8 वाजता पालखी सोहळ्याची कर्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे. पेशव्यांच्या इशारतीने खांदेकरी, मानकरी भाविकांनी उत्सवमूर्तींची पालखी उचललाई, यावेळी गडकोटात मोठ्या प्रमाणावर भांडार खोबऱ्याची उधळण करण्यात येत होती. सोहळ्यातील उपस्थित प्रत्येक भाविक भारावलेल्या अवस्थेत देवाचा जयघोष करीत होता.

No comments