web-banner-lshep2024

Breaking News

पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे निलंबित

BY - युवा महाराष्ट्र लाइव – गडचिरोली |  

येथे कुरखेडा भुसुरुंग स्फोट झाला होता. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत काळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील कुरखेडा भागात नक्षलवाद्यांनी भुसुरंग स्फोट घडवला होता. यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांच्या पत्नी भारती गायकवाड यांनी एसडीपीओ शैलेश काळे यांच्या निष्काळजीपणामुळेच क्यूआरटीचे 15 जवान शहीद झाल्याचा गंभीर आरोप केला होता.

No comments