web-banner-lshep2024

Breaking News

तेजप्रताप यादव यांच्या बॉडीगार्डची पत्रकाराला मारहाण

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - बिहार |

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानात हिंसाचाराच्या बातम्या आल्या आहेत. दरम्यान बिहारमधील पटनामध्ये रविवार हिंसा झाली यामध्ये लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केली. तेजप्रताप यांच्या गाडीखाली कॅमेरामन आला होता, याचा विरोध केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केली आहे. घटनेनंतर तेजाप्रताप यांनी उलटा आरोप पत्रकारांवर केला आहे. यावेळी ते म्हणाले, माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याची अधिकृत तक्रार दिली आहे. रविवारी तेजप्रताप घरातून बाहेर येत असताना त्यांच्या गाडीखाली कॅमेरामनचा पाय आला. त्यानंतर कॅमेरामनने त्याचा कॅमेर गाडीच्या काचेवर मारला यामध्ये गाडीची काच फुटली. यानंतर सुरक्षारक्षकांनी उपस्थित पत्रकारांना मारहाण व धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर तेजप्रताप यादव यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये ते लिहितात ‘आज मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर येताना माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये माझी गाडी क्षतिग्रस्त झाली. त्याबरोबर ड्राइवर आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत.

No comments