गौण खनिजांची चोरी करण्याचा धडाका चालकाला अटक
BY
- युवा महाराष्ट्र लाइव - नाशिक |
नांदगांव येथे वाळु माफीयांचा मध्यराञी नंतर
गौण खनीजाची चोरटी वाहतूक करण्याचा धडाका कायम सुरूच आहे अशाच एका घटनेत पोलिसांनी
चित्तथरारक पाठलाग करुन वाळूमाफींच्या वाहन चालकाला शिताफीने अटक केले. पोलिसांना न
जुमानता भरधाव वेगाने वाहन चालवून त्यात क्षमते पेक्षा अधिक वजनदार गौणखणीजाची चोरटी
वाहतूक करताना एक डंपर मिळून आला. नांदगांव पोलीस नांदगांव मनमाड चौफुलीवर गस्ती घालत असताना मध्यराञी 3 च्या सुमारास एम एच 15 एफव्ही 2324. टाटा डंपर नांदगांव बाजूने मनमाड दिशेने जात असताना चालक भगवान विश्राम बागले यांची गाडी रोखण्याचा व थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो न थांबता भरधाव वेगाने निघून गेला त्यात चोरीचा माल असेल असा संशय गस्ती पोलिसांना आला त्यावरून त्या डंपरचा चित्तथरारक पाठलाग करुण त्यास थांबले.नाव गाव परवाना विचारला पण गाडीचे पेपर सोबत नाही म्हणून गाडीचा तपास घेतला असता वाहन चालका जवळ एक जुने खाडाखोड केलेले वाळूचे दोन ब्रास चे परमिट आढळले. तर गाडीत सुमारे सहा ब्राॅस गौण खनिज वाहतूक करताना 18 मे रोजी पहाटे ३ च्या सुमारास पळून जाताना नांदगांव मनमाड रोडवर हिसवळ बु, शिवारात मिळून आली. ही डंपर हा मुळडोंगरी शिवारातुन मण्याड नदीपाञातिल गौणखनीजाची चोरटी वाहतूक करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.



No comments