बारवी धरणग्रस्ताचा प्रश्न मार्गी लागला ; आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते भुखंड धनादेश वाटप ; नोकर्यांचा प्रश्नही मार्गी
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
गेली काही वर्षे बारवी धरणग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित होत्या त्यामुळे बारवी धरण उंची वाढीचा विषय गंभीर बनला असता स्थानिक आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रयत्नाने बारवी धरणाचा प्रश्न मार्गी लागला असून भुसंपादित शेतकर्यांना भुखंडाचा कोटी रूपये निधी तोंडली येथे आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
बारवी धरण उंची वाढ झाल्याने बारवी भुसंपादित शेतकर्यांचे भुसंपादन,घरांचे पैसे,त्यांना देण्यात येणारे भुखंड,संपादतांना नोकर्या हृया सर्वच समस्या मिटल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तोंडली येथे भुसंपादित शेतकर्यांना 71 जनांना एम.आय.डी.सी कडून देण्यात येणार्या भुखंडाच्या बदल्यात पैसे घेणार्या शेतकर्यांना कोटी रूपये आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असून भुसंपादित शेतकर्यांच्या नातेवार्इक मुलांना नोकर्यामध्ये सामावून घेण्याची यादी तयार असून लवकरच त्यांना नोकर्यात सामावून पावसाळयात पाण्याखाली बुडणार्या घरांचा मार्ग निकाली निघाला आहे यामध्ये तोंडली,काचकोली,मानिवली,कोळीवाडी,सुकानवाडी,बुरूडवाडी,जांभूळवाडी,मार्गाचीवाडी,दवेपाडा,मोहोघर अन्य वाडयाचा समावेश भुसंपादनात आहे.
मुरबाड बारवी धरणाच्या बाधीत तोंडली येथील 71 शेतकरी कुटूंबाना भुखंडाचे तसेच 10 लाखांच मुल्यांकन असलेल्या घर कुटूंबांना निधीचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून याप्रसंगी बारवी धरण कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण,शिंदे,कळसकर,खोत,राजेश चव्हाण,वाघ,मयेकर अन्य अधिकार्यांसह गावचे पोलिस पाटील जगन मुकणे सर्व गांवकरी अनंत मेंगाळ,मनू बांगारा अन्य लोकसेवक उपस्थित होते.
धनादेश वाटप यातील बहुतांशी आदिवासी कुटूंबाना स्थलांतराचा त्रास सहन करावा लागत होता व साध्या शेड मध्ये रहावे लागत होते मात्र आमदार किसनराव कथोरे यांच्या अचक प्रयत्नाने बाधित कुटूंबाना पक्के घर बांधून निवासाचा आनंद होता येणार आहे.बारवी धरण प्रकल्पग्रस्त गावांतील बाधतिांना सर्वांनाच त्यांचा लाभ मिळत असल्याने शेतकर्यांनी आदिवासी बांधवाने आमदार किसनराव कथोरे यांचे आभार मानले आहे.
बारवी धारणाखाली बाधीत असलेल्या गोर गरिबांना न्याय मिळत नव्हता त्यांच्या नावे काही कोटीचा गैरव्यवहार झाला होता.बोगस घरे,बोगस खर्च आणि नियोजन शुन्य न्यायाच्या प्रतिक्षेत शेतकरी आदिवासी बांधव होते येथील सर्व गैरव्यवहाराची चौकशी आमदार किसनराव कथोरे यांनी शासन दरबारी लावून भ्रष्ट अधिकार्यांची येथून हाकालपट्टी केले.शेतकर्यांच्या नावावर दलाली करणार्या अधिकार्यांसह त्यांच्या मित्रांना आमदार किसनराव कथोरे यांनी चपराक देवुन बारवी धरणाचा धुळकात पडलेला प्रश्न मार्गी लावला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उद्दयोगमंत्री,संबंधित मंत्री अधिकार्यांनी भुसंपादीतांच्या समस्या माडून त्यांना निधी उपलब्ध करून दिले.नोकर्यांचा,भुखंडाचा प्रश्न मार्गी लावण्यात आमदार किसनराव कथोरे यांचे योगदान लाभले आहे.



No comments